हर्सल-चिकलठाणवासीयांची पाणीटंचाईतून लवकरच सुटका १२ जूनपासून मिळणार नव्या योजनेचे पाणी; १२-१४ दिवसांच्या टंचाईचा फेरा संपणार

Foto
छत्रपती संभाजीनगर, सांजवार्ता ब्युरो): गेल्या  अनेक महिन्यांपासून पाण्यासाठी तीव्र टंचाई सोसणाऱ्या हर्सल आणि चिकलठाणा भागातील नागरिकांसाठी आनंदाची आणि दिलासादायक बातमी आहे. सध्या तब्बल १२ ते १४ दिवसांनी पाणी मिळणाऱ्या या परिसरात लवकरच नवीन योजनेचे पाणी पोहचणार आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने ९०० मिमी व्यासाची जलवाहिनी पूर्ण क्षमतेने कार्यान्वित केली असून, शहराला याद्वारे १५ एमएलडी वाढीव पाणी मिळण्यास सुरुवात झाली आहे. इतकेच नव्हे तर येत्या १२ जूनपासून नवीन पाणीपुरवठा योजनेद्वारे थेट
पाणी देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असून, त्यामुळे पाणीपुरवठ्यातील दिवसांचा मोठा गॅप कमी होणार आहे.
१५०० मिमीच्या जलवाहिनीतून येणारे नवीन योजनेचे पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचणार आहे. या योजनेच्या कामाचा सातत्याने आढावा घेण्यात येत आहे. नक्षत्रवाडी येथून १५०० मिमी, २००० मिमी व्यासाच्या
सिडकोची लाइन होणार बंद
▶ सिडको-हडको भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी एक्सप्रेस लाइन टाकण्यात आलेली आहे. या जलवाहिनीद्वारे दररोज ५० ते ५५ एमएलडी पाणीपुरवठा होतो. सध्या कमी प्रमाणात पाणी मिळत असल्याने, अनेक भागांपर्यंत पाणी पोहोचत नाही. रामनगर, संजयनगर, चिकलठाणा आदी भागांना कमी दाबाने पाणी मिळते. नवीन योजनेच्या १५०० मिमीच्या जलवाहिनीतून पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर सिडकोची एक्स्प्रेस लाइन बंद करण्यात येईल. या लाइनद्वारे गारखेडा, शिवाजीनगर, जयविश्वभारती कॉलनी भागासाठी पाणी दिले जाईल, असेही आयुक्त येडगे यांनी सांगितले.
जलवाहिन्यांमधून पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. १५०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. यासंदर्भात मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, जायकवाडीचे पाणी
नक्षत्रवाडीतील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत आणण्यात आले आहे. तिथून ते पुढे शहरात आणण्यासाठी नियोजन केले जात आहे. शहरातील वितरण व्यवस्था आणि जलकुंभाच्या कामांचा आढावा घेण्यात येत आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions